आज तुळशीच्या लग्नाचा मुहूर्त; असे आहे महत्त्व

पुणे : आज कार्तिकी एकादशी असून समस्त वारकºयांचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाची वारीही आहे. आजच्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी किंवा देवोत्थान एकादशी असेही म्हणतात. चातुर्मासाची समाप्ती आजच्या दिवशी होते. आषाढी एकादशी अर्थातच देवशयनी एकादशी ते कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउठनी एकादशी या चार महिन्यांच्या कालावधीत भगवान विष्णू आपल्या निद्रेतून जागे होतात आणि त्यानंतर सर्व शुम कामाला सुरूवात होते असे समजले जाते. याच दिवशी तुळशीच्या लग्नाला सुरूवात होते आणि त्यानंतर लग्नांचे मुहूर्त सुरू होतात.

असा आहे तुळशीच्या लग्नाचा मुहूर्त
श्रीविष्णूंचे लग्न आजच्या दिवशी तुळशीसोबत लावले जाते. अनेक ठिकाणी हा मोठा सोहळा असतो. वाजत गाजत हे लग्न लागते. असे समजले जाते की तुळशीच्या लग्नामुळे कन्यादानाचे पुण्य मिळते. तुळशीच्या विवाहाचे मुहूर्त कोणते आहेत? ते आपण पाहणार आहोत.
कार्तिकी एकादशीच्या दिवशी चातुर्मास समाप्त होतो. पंचांगानुसार आज सोमवारी सकाळी 6 वाजून 39 मिनिटांनी एकादशी तिथी समाप्त होत असून त्यानंतर द्वादशी तिथीला आरंभ होईल. त्यामुळे तुळशीचे लग्नही 15 नोव्हेंबरला द्वादशीला करावे लागणार आहे. त्याचे मुहूर्त पुढीलप्रमाणे :
तुळशीच्या लग्नाची तिथी : 15 नोव्हेंबर 2021, सोमवार
द्वादशी तिथी प्रारंभ : 15 नोव्हेंबर सकाळी 6 वा. 39 मिनिटांनी
द्वादशी तिथी समाप्ती : 16 नोव्हेंबर सकाळी 8वा. 01 मिनिटांनी

तुळशीच्या विवाहाचे मुहूर्त
15 नोव्हेंबर 2021 : रोजी दुपारी 1 वाजून 02 मिनिटांपासून ते दुप15ारी 2 वाजून 44 मिनिटांपर्यंत
15 नोव्हेंबर 2021 : रोजी संध्याकाळी 5 वाजून 17 मिनिटांपासून ते 5 वाजून 41 मिनिटांपर्यंत

तुळशीच्या लग्नाचे विधी
एका चौरंगावर तुलशीचे रोप आणि दुसºया चौरंगावर बाळकृष्णाची स्थापना करावी. त्याच्या शेजारी एक पाण्याचे भरलेला कलश ठेवून त्यावर आंब्याची किंवा विड्याची पाच पाने ठेवावीत. तुलशी वृंदावनाला किंवा कुंडीला गेरूने रंगवावे आणि तिथे तुपाचा दिवा पेटवावा. तुलस आणि बाळकृष्णावर गंगाजल शिंपडावे आणि दोघांनाही गंध-अक्षता लावाव्यात. तुळशी वृंदावनातच उसाच्या साह्याने छोटाचा मंडप तयार करावा. त्यानंतर तुलशीला सौभाग्याचे प्रतिक म्हणून लाल वस्त्र लपेटावे, तसेच वृंदावन किंवा कुंडीला साडी गुंडाळून सौभाग्याचे प्रतिक असलेला चुडा अर्पण करावा. तसेच सौभाग्यालंकारांनी सजवावे. त्यानंतर बाळकृष्णाला चौरंगासह हातात घेऊन तुलशीच्या चौरंगाभोवती सात फेरे मारावेत. मंगलाष्टके म्हणावीत आणि आरती करून प्रसादाचे वाटप करावे.

तुळशीच्या विवाहाचे असे आहे महत्त्व
असे म्हणतात की तुळशीचे लग्न लावणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी श्रीविष्णूच्या रुपातील बाळकृष्ण किंवा शाळीग्रामाचे तुळशीशी लग्न लावल्याने श्रीविष्णूची कृपा विवाह लावणाºयावर सदैव राहते आणि त्याच्या आयुष्यातील दु:ख व कष्ट यांची समाप्ती होते. तुलशीच्या लग्नाने कन्यादानाचे पुण्य मिळते आणि तुळशीचे लग्न लावणाºयाचे वैवाहिक आयुष्य सुखात जाते.